Lonavala : आडोशी बोगद्याजवळ ट्रक उलटल्याने एक्सप्रेस वेवर वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज : आज सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या (Lonavala) सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ किमी 40/300 वर एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याच्या मध्ये पलटी झाला.

या अपघातात ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने मुंबई दिशेकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. महामार्ग पोलीस, आयआरबी कर्मचारी व अन्य पथकांनी रस्त्यावरील माल बाजूला करत दोन लेन सुरु केल्या. वाहतूक धिम्म्या गतीने सुरु झाली आहे. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर दिड ते दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.