सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Lonavala : ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर खंडाळा एक्झिटजवळ वाहने बंद पडल्यामुळे अडीच तास वाहतूक ठप्प!

एमपीसी न्यूज – ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिट येथील चढ आणि वळणावर तीन वाहने अचानक बंद पडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. हि घटना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता खंडाळा एक्झिट येथे घडली होती.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खंडाळा एक्झिट येथे किलोमीटर क्रमांक ४२/५०० येथे चढावर एक कंटेनर पहाटे साडेपाच वाजता मार्गावर अचानक बंद पडला होता. या घटनेची माहिती समजताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत मंडले यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करत बंद पडलेला कंटेनर बाजूला करण्यासाठी पुलरला प्राचारण करण्यात आले होते.

  • यावेळी बंद पडलेल्या कंटेनरला बाजूला करण्यासाठी गेलेला पुलरसह अन्य एक ट्रकही मार्गावर अचानक बंद पडल्याने पुण्याकडे जाणरी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामार्गावर वाहनांच्या आठ ते नऊ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी आठ वाजता पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली.
spot_img
Latest news
Related news