Lonavala : नांगरगावातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह; एकाच कुटुंबातील तिघे बाधित

Two corona positive in nangargaon ; Infected three from the same family :एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट

एमपीसीन्यूज : लोणावळा येथील नांगरगाव येथे कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या ज्येष्ठ महिलेल्या कुटुंबातील इतर दोन जणांचे कोरोना तपासणी अहवाल आज पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भांगरवाडी येथील एका युवकाचा अहवाल देखील काल पाॅझिटिव्ह आला होता. लोणावळा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शहरातील आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या 12 झाली आहे.

नांगरगाव येथे राहणार्‍या एका ज्येष्ठ महिलेला 4 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या हायरिस्क संपर्कातील पाच जणांचे अहवाल दोन दिवसांपूर्वी निगेटिव्ह आले होते, तर पती व मुलगा या दोन जणांचे अहवाल आज पाॅझिटिव्ह आले.

भांगरवाडी येथे सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील चार जणांचा क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यांचे देखील स्वॅब घेण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like