Lonavala : कुसगाववाडीत दोन गटात हाणामारी; 12 जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. : Two groups clash in Kusgaonwadi; 12 charged

0

एमपीसीन्यूज : कुसगाव वाडी ( ता. मावळ) येथे आज, शनिवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील मिळून 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली.

लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुर्यकांत बबन घारे (वय 32, रा. कुसगाववाडी) यांच्या फिर्यादीवरून महादु बबन चव्हाण, सागर महादु चव्हाण, सुरज महादु चव्हाण, हनुमंत सहादु साबळे या चार जणांच्या विरोधात धारदार शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम 307, 323, 504, 506, 34 व भारतीय हत्यार कायदा कलम 4 (27) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तर दुसरी फिर्याद सागर महादु चव्हाण यांनी दिली आहे.

या फिर्यादीवरून चंद्रकांत बबन घारे, सुर्यकांत बबन घारे, योगेश चंद्रकांत घारे (सर्व राहणार कुसगाववाडी), अनिकेत बाळू पिंगळे, आशुतोष बाळू पिंगळे, अक्षय तुळशीराम पिंगळे (सर्व राहणार वाकसईचाळ), अमित दत्तात्रय पारिठे (रा.औंढोली), किरण गजानन ननावरे (रा.भैरवनाथनगर, कुसगाव) याच्या विरोधात भादंवि कलम 143, 147, 149, 324, 504, 506 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसापुर्वी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून ही भांडणे झाली आहेत. यामध्ये तलवारीने डोक्यात वार केल्याने सुर्यकांत घारे व योगेश घारे गंभिर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार शेख व पोलीस नाईक चाकणे पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like