Lonavala: दुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना मारहाण करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Lonavala: Two policemen suspended for beating youths on two-wheeler दोन दुचाकी गाड्यांवरून चार तरुण लोणावळा बाजारपेठेकडे येत असताना मुंबई पुणे महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ खासगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलीसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले.

एमपीसी न्यूज- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (दि.15) रात्री गवळीवाडा येथे ही घटना घडली.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील जयराज देवकर व माणिक अहिनवे अशी या निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

सोमवारी रात्री दोन दुचाकी गाड्यांवरून चार तरुण लोणावळा बाजारपेठेकडे येत असताना मुंबई पुणे महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ खासगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलीसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले.

मात्र त्यांना साईड न दिल्याच्या कारणावरून गाडीतील तरुण व साध्या वेशात असलेले पोलीस कर्मचारी यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. याचे पर्यवसन भांडणात झाल्याने दोन्ही गटाकडून एकमेकाला मारहाण करण्यात आली.

यात पोलीसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाला फार मार लागला असून एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.