Lonavala : जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेशकुमार माधवलाल किराणा दुकान आणि ज्योती कोल्ड्रिंक्स अँड जनरल स्टोअर्स या दोन्ही दुकानाच्या समोर 5 पेक्षा अधिक ग्राहकांची गर्दी जमल्याने भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये दोन्ही दुकानाच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.