Lonavala : पवना धरणात बुडून पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाला. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रोहित कोडगिरे (वय 21, राहणार एम.एम.जी.ओ.ई.हाँस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ गांव पोलीस कॉलनी नांदेड) व सुजित जनार्दन घुले (वय 21, राहणार एम.एम.जी.ओ.ई. हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मूळ राहणार अहमदनगर) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

  • मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ काँलेज आँफ इंजिनिअरिंग काँलेजचे 11 विद्यार्थी मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. फागणे गावाच्या बाजुने ते सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यात पोहण्याकरिता उतरले असता पाय घसरुन पडल्याने रोहित व सुजित हे पाण्यात बुडाले, त्यांना वाचविण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती समजत‍ाच स्थानिकांनी धरणाच्या पाण्यात शोध घेत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रोहितचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला मात्र सुजितचा मृतदेह सापडत नसल्याने लोणावळ्यातील शिवदुर्ग पथकाला पाचारण करण्यात आले होते. शिवदुर्गचे अनिल आंद्रे, रोहित आंद्रे, अतुल लाड, मोरेश्वर मांडेकर, कपिल दळवी, महेश मसणे, आनंद गावडे, दुर्वेश साठे, राजेश ठाकर, सनी कडु, प्रवीण ढोकळे, समीर जोशी, राजेंद्र कडु, सुनील गायकवाड, प्रणय अंबुरे यांनी पाण्यात शोध मोहिम राबवत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुजितचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सोबतच्या दोन मित्रांचा अशा प्रकारे दुदैवी अंत झाल्याने सोबतचे मित्र घाबरून गेले होते.
  • याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकिल शेख व पोलीस नाईक जितेंद्र दीक्षित पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.