-MPC-TOP-MOST-BANNER-I

Lonavala : नांगरगावातील कंपनीत चोरी करणारे चोरटे मुद्देमालासह अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील अॅलेक्स ग्राईंडर प्रा. लि. या कंपनीच्या टेरेसवरुन 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनियम धातूचे पार्ट चोरी करणारे दोन्ही चोरट्याना लोणावळा शहर पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली. स्थानिक गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

कॅलेब सुभाष नागावकर (रा. गुरववस्ती, लोणावळा) व संजय वामन धोंदवे (रा. जांभुळ, त‍ा. म‍ावळ) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

30 सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कॅलेब व संजय या दोघांनी कंपनीच्या टेरेसवरुन अॅल्युमिनियमचे जाॅब कंपनीच्या सुरक्षाभिंतीच्या बाहेर टाकून ते विकण्याकरिता चोरले होते. या प्रकरणी कंपनीचे प्रकाश हेडगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सांगळे, पोलीस नाईक श्रीशैल कंटोळी, वैभव सुरवसे, जयराज देवकर, प्रशांत खुटेमाटे, राम जगताप यांच्या पथकाने सापळा रचत दोन्ही आरोपींना लोणावळ्यात त‍ाब्यात घेत मुद्देमालासह अटक केली.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn