Lonavala News : खंडाळा येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

आज, शनिवारी (दि.08 ) सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात घडला. : Two-wheeler policeman killed in tempo collision at Khandala

एमपीसीन्यूज : खंडाळा गावाच्या हद्दीमध्ये टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आज, शनिवारी (दि.08 ) सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात घडला.

रमेश अशोक आगळे (वय 41, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि पुणे) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , रमेश आगळे हे खोपोली याठिकाणी रेल्वे पोलीस दलात कार्यरत होते. ड्युटी संपवून ते पल्सर दुचाकीवरून (एमएच. 22/एसी./9975) घरी तळेगावकडे परत जात होते.

खंडाळा गावाच्या हद्दीमध्ये कोहिनूर कॉलेजच्या गेट समोर टाटा टेम्पोची (एमएच14/इएम/0965) त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

उपचारासाठी त्यांना खंडाळ्यातील चंपक हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.