BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : बाजारपेठेमध्ये आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

0

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या दीपक हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या एका गल्लीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

अंदाजे 45ते 50 वर्ष वय असलेल्या या व्यक्तीचा रंग गोरा असून त्याचे केस भुरे रंगाचे आहेत. सदर व्यक्तीची उंची पाच फूट असून अंगावर राखाडी रंगाचा स्वेटर आणि निळ्या रंगाची पँट परिधान केलेली आहे. सदर वर्णनाची व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास त्यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like