BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : अनोळखी वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – लोणावळ्या जवळील एअर फोर्स स्टेशनजवळ लोणावळा सहारा रोडवर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

गौरव रतन चोबे (वय 17, रा.बिशनपूर, जि. जोनपूर, उत्तरप्रदेश) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

  • याबाबत लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव हा त्याच्या नातेवाईकाकडे 20 दिवसांपूर्वी काही कामानिमित्त आला होता. शुक्रवारी सकाळी त्याच्या नातेवाईकाची ऍक्टिव्ह (एमएच 14 जीएफ 1679) ही दुचाकी घेऊन टायगर पॉईंटच्या दिशेने एअर फोर्स स्टेशनकडे येत होता.

यावेळी एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे गौरव हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.