Lonavala : विजयकुमार जोरी राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काउट्स आणि गाईड्स पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काउट्स आणि गाईड्स पुरस्कार व्ही.पी.एस. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक व जिल्हा स्काऊट आणि गाईड संघटक विजयकुमार जोरी यांना प्रदान करण्यात आला.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते जोरी यांना सन्मानित करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य संजीव रत्नपारखी व स्काऊट शिक्षक संजय पालवे, दीपक पिसे, धुलाजी देवकते, राहुल गांगुर्डे, वैशाली तारू यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने आजपर्यंत जोरीसरांनी केलेल्या उतुंग कार्याची पोचपावती मानली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. मुंबईत झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला विजयकुमार जोरी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.