BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : दोनशे एक वर्षानंतर पुन्हा विसापूर किल्ल्यावर विजयादशमी साजरी

शिवकालीन परंपरेला पुन्हा सुरुवात

एमपीसी न्यूज- दोनशे एक वर्षांनंतर शिवकालीन परंपरेला पुन्हा सुरुवात करीत किल्ले विसापूर येथे विजयादशमी साजरी करण्यात आली. बजरंगदल आणि विश्वहिंदू परिषद मार्फत हा उपक्रम सुरू करण्यात आला.

यावेळी बजंरग दल मंत्री संदेश भेगडे, गोपिचंद महाराज कचरे, इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्था अध्यक्ष निलेश संपतराव गराडे, बाळा खांडभोर, भास्कर गोलिया, विकी शेटे, सुधीर दहिभाते आदी वीर बजंरगी उपस्थित होते

यावेळी लोहगडवाडीच्या पाटील कुटुंबाला विसापूर दुर्गावर सन्मानाने बोलावण्यात आले. त्यांच्या हस्ते नारळ वाढवुन शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला शिवकालीन पाटील यांचे वंशज सुरज साबळे व गणेश साबळे उपस्थित होते. इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे य‍ांनी दुर्ग विसापुरचा इतिहास सांगितला.

बाळा खांडभोर प्रास्ताविक केले. देहुरोडचे संयोजक सचिन शेलार य‍ांनी बजंरग दलातर्फे वर्षभरात केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली. सागर कटके यांनी आभार मानले.

Advertisement