BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : गडपूजन करून तिकोनागडावर साजरी झाली विजयादशमी

सोने लुटायच्या कार्यक्रमाला इतिहासप्रेमींची उपस्थिती 

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवराय यांच्या प्राणप्रिय गडकोटांचे पूजन आणि सोने लुटण्याच्या कार्यक्रमाने तिकोणा गडावर विजयादशमी साजरी करण्यात आली. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संस्थेच्या पुढाकारातून विजयादशमीच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळाला. 

दसरा म्हंटल्यावर सकाळी सर्वत्रच स्वच्छता पुजा पाठ याची लगबग असते या लगबगीत या गडकोटांकरिता कोणाकडे वेळ नसतो. म्हणूनच गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संस्थेच्या पुढाकारातून किल्ले तिकोणा गडावर विजयादशमी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवराय यांचे शस्त्र, सुरक्षा, निवारा म्हणजे हे गडकोट. या गडकोटाचे पूजन करण्यात आले.

मावळ्यांनी घरातील पुजापाठ करून लगेच तिकोणागडाकडे पुजा साहित्यासह निघाले. विजयादशमीकरिता लागणारे हार फुल पोलीस नाईक संदीप ओझरकर यांनी उपलब्ध करून दिले. नित्य नियमाने वेताळ महाराज, चपेटदान मारूतीराय, तळजाई माता लेणी व वितंडेश्वर मंदिरात हार फुलांची सजावट करण्यात आली. गडाच्या वास्तूवर तसेच महादरवाजा येथे हार फुलांचे तोरण लावण्यात आले. त्यानंतर गडाचे पूजन करण्यात आले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3