BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : व्ही .पी .एस. हायस्कूलमध्ये संगीतवर्ग सुरु

एमपीसी न्यूज : व्ही .पी. एस हायस्कूलमध्ये प्राचार्य संजीव रत्नपारखी यांच्या हस्ते संगीतवर्गाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी उपमुखाध्यापक विजयकुमार जोरी, पर्यवेक्षक दादाभाऊ कासार, विक्रम शिंदे, क्षमा देशपांडे, सविता साळवेकर, रामदास दरेकर, उज्वला पिंगळे, मारुती तारु उपस्थित होते. अभ्यास व खेळाबरोबरच संगीताची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्राचार्य रत्नपारखी यांनी सांगितले.

धनंजय काळे यांच्या संकल्पनेतून ही संगीतवर्ग सुरु करण्यात आला. त्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी गणेश ढाकोळ व संदीप वर्मा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमांचे माहिती संकलन संजय पालवे यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3