Lonavala: खंडाळा गावठाणात वड व गुलमोहराची झाडे पडली; मिनीबसचे नुकसान

एमपीसी न्यूज – लोणावळा व खंडाळा परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे खंडाळा गावठाण येथे वड व गुलमोहराचे झाड एका मिनीबसवर पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

लोणावळा परिसरात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे, त्यातच शनिवारी रात्री पावसाच्या सोबत सोसाट्याचा वारा देखील राहिल्याने खंडाळ्याच्या दोन मोठी झाडे उन्मळून पडली. माजी नगरसेवक विजय सिनकर यांनी या घटनेची माहिती नगरपरिषदेला दिली.

_MPC_DIR_MPU_II
  • डोंगरगावातील 150 घरे अंधारात
  • लोणावळ्याजवळील डोंगरगाव वेताळनगर येथील डी. पी. खराब झाल्यामुळे येथील सुमारे दीडशे कुटुंबाना अंधारात रहावे लागले आहे. येथील उघड्या डी. पी. चे काम करा याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार तक्रारी व सूचना करून देखील अधिकारी लक्ष घालत नसल्याने नागरिकांवर आज अंधारात राहण्याची वेळ आली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.