Lonavala : लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत घरोघरी आगमन

एमपीसी न्यूज- ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात व ढोल ताश्यांच्या मंगलमय सुरात आज लाडक्या बाप्पांचे घरोघरी आगमन झाले.

सकाळपासूनच बाजारपेठेत गणरायांची मूर्ती घरी नेण्याकरिता भाविकांची गर्दी झाली होती. प्राणप्रतिष्ठापना करण्याकरिता तात्या मंडळींची देखील लगबग पहायला मिळत होती. दुपारनंतर लोणावळ्यात सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. मागील आठवडा भरापासून पावसाने चांगली उघडीप दिल्याने सर्वत्र भाविकांचा आनंद ओसांडून वाहत होता. बाजारपेठेत पूजेचे साहित्य खरेदीकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होता. शहरातील सर्वच भागात गणेश उत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.