Lonavala : न्यू तुंगार्लीत पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला; संशयित आरोपी अटक

एमपीसी न्यूज – सासरवाडीत जाऊन पत्नीवर कोयत्याने हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज सकाळी साडेदहा लोणावळ्यात घडला.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी आरोपी राजाराम साहेबराव जाधव (रा. कशाळभोईरे, ता. मावळ, जि. पुणे) यासह घटनास्थळावरुन कोयत्यासह त‍ाब्यात घेत अटक केली. जाधव यांची सासू सखुबाई गबळू लंके (वय 65, रा. न्यु तुंगार्ली, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.

लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजाराम जाधव आणि फिर्यादी यांची मुलगी अनिता याचे 25 वर्षापूर्वी लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून जाधव हा पत्नीला मारहाण करत असल्याने लग्नानंतर साधारण दीड वर्षापासून ती माहेरी निघून आली. तेव्हापासून ते विभक्त रहात आहेत. असे असले तरी राजाराम जाधव हा सासरवाडीत येऊन अनिता यांना शिविगाळ व मारहाण करायचा.

आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजाराम जाधव हा हातात कोयता घेऊन सखुबाई व अनिता माळीकाम करत असलेल्या बंगल्यात गेटवरुन उडी मारुन घुसला. त्याने प्रथम सासूवर आणि त्यानंतर अनितावर जिवघेणा हल्ला केला. त्याने अनिताच्या चेहर्‍यावर व हातावर सपासप वार करत तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

राजाराम हा सासू सखूबाई व मुलगी सुषमा यांना देखील पुढे आलात तर खल्लास करेन, असे म्हणत होता हा सर्व प्रकार फिर्यादी यांचा मुलगा रामचंद्र लंके याने लोणावळा शहर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल कसबेकर, पंढरीनाथ कामठे, बंटी कवडे, भरत मोरे हे सरकारी गाडीतून तर वाहतुक हवालदार विजय जांभळे व रविंद्र सरसे हे दुचाकीवरुन अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळावर पोहचले व त्यांनी आरोपी राजाराम याच्या तावडीतून सखूबाई व सुष्मा यांची सुटका केली तर रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस जीपमधून अनिता यांना रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.