Lonavala  : इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू

एमपीसीन्यूज  : पावसाळा तोंडावर आला असल्याने लोणावळा शहरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम लोणावळा नगरपरिषदने सुरू केले आहे. कैलासनगर परिसरात सध्या काम सुरू असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता मागील दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन व संचारबंदी असल्याने खाजगी कामांप्रमाणे अनेक शासकिय कामे देखिल बंद झाली होती. मागील आठवड्यात शासनाने अत्यावश्यक सेवेतील कामे तसेच पावसाळापुर्व कामे करण्याची परवानगी दिल्यानंतर शहरातून वाहणारी इंद्रायणी नदीपात्र स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.

नदीपात्रातील जलपर्णी व गाळ बाजुला करत पात्र पाण्याकरिता मोकळे करण्यात येणार आहे. लोणावळा शहरातील पाणी तसेच लोणावळा धरणातील पाणी या नदीमार्गे शहराबाहेर जाते. तिचे पात्र तुंबल्यास लोणावळा शहराला पुराचा धोका असतो, याकरिता नदीपात्र स्वच्छता कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.

सोबतच भांगरवाडी भागात ड्रेनेज लाईनकरिता खोदलेल्या रस्त्यांवर देखील डांबरी पॅचवर्क करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्धवट असलेली 27 खाजगी बांधकामे सुरू

लाॅकडाऊन पुर्वी सुरू झालेली मात्र लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे बंद राहिलेली कामे आता पुन्हा सुरू झाली आहेत. 27 कामांना लोणावळा नगरपरिषदेकडून मान्यता घेत सुरुवात करण्यात आली आहे.

पावसाळा तोंडावर असल्याने कोणाला घराची किरकोळ डागडुजी अथवा पत्रा बदलणे, लिकेजेस, वाॅटर फ्रुप्रिंग अशी कामे करायची असल्यास त्यांनी नगरपरिषदेमध्ये त्याप्रमाणे अर्ज दाखल केल्यास त्यांना परवानगी देण्यात येणार आहे.

परवानगी घेताना बांधकाम साईटवर कामाकरिता आवश्यक असणारे मजूर यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था तसेच कामाचे फोटो, कामागार व सुपयवारझर यांची माहिती नगरपरिषद बांधकाम विभागात सादर करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like