Lonavala : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे ऑनलाईन पद्धतीने आमिष दाखवून तरुणीकडून दीड लाख रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न देता तरुणीची फसवणूक केली. हा प्रकार 7 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान लोणावळा येथे घडला.

अंकिता राजू खजाना (वय 22, रा. आय एन एस शिवाजी, भुशी डॅम जवळ, रामनगर, लोणावळा) या तरुणीने याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता लोणावळा येथे शिक्षण घेत आहे. तिला [email protected] या मेल आयडी वरून वारंवार नोकरी देण्याचे मेल आले. तसेच तिला तिच्या मोबाईल फोनवर फोन करून देखील नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. वारंवार येणा-या मेल आणि फोनवरून अंकिताने नोकरी करण्याचे मान्य केले. त्यानंतर नोकरी लागण्यासाठी पैसे भरावे लागत असल्याचे सांगितले. त्यानुसार अंकिताने वेळोवेळी आरोपींनी दिलेल्या खात्यावर 1 लाख 55 हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरोपींनी अंकिता सोबत कोणत्याही प्रकारचे संपर्क ठेवले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने लोणावळा पोलिसात धाव घेतली. लोणावळा पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.