Lonavala : लोणावळ्यात गँगरीनमुळे तरुणाचा मृत्यू

सदर मयता बाबत कुणास काही माहिती असल्यास तात्काळ लोणावळा शहर पोलीस स्टेशन​​शी संपर्क साधावा

एमपीसी न्यूज – पायाला गँगरीन झाल्याने लोणावळ्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. सुजित सुरेश जाधव (वय 33 वर्ष रा. औरंगाबाद, पूर्ण पत्ता माहित नाही) असे या तरुणाचे नाव आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजार भागात सदर तरुण मृत अवस्थेत आढळू आला. त्याच्या डाव्या पायाला गँगरीनचा त्रास होता, तो आज औषध उपचारा दरम्यान मयत झाला असुन लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे सदर बाबत, अकस्मात मयत नोंद करण्यात आली आहे.

सदर मयताचे प्रेत हे खंडाळा येथील शवग्रहात ठेवण्यात आले आहे. मयताचे नातेवाईक अदयाप मिळून आलेले नाहीत, तरी सदर मयता बाबत कुणास काही माहिती असल्यास तात्काळ लोणावळा शहर पोलीस स्टेशन​शी संपर्क साधावा (क्रं. 02114/273033 किंवा, मो.नं. 9309847178) असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.