Lonavala : मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज चार तास खुली राहणार

प्रांताधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश लागू

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील सर्व शहरांसह लोणावळा शहरातील भाजीपाला, फळे, किराणा, भुसारा, मटण, चिकन ही सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यत म्हणजे दररोज चार तास खुली ठेवण्याचा आदेश प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी दिला दिला आहे. त्याचवेळी घरोघरी केली जाणारी दुध विक्री सकाळी सहा ने नऊ यावेळेत राहणार आहे.

प्रांत अधिकारी यांनी यापुर्वी लोणावळा शहरासह मावळ व मुळशी तालुक्यात यापुर्वी स्थानिक प्रशासनाने दिलेले सर्व आदेश रद्द करत हा सुधारित आदेश लागू केला आहे.

मुंबई व पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. लोणावळा शहराला लागून असलेल्या खोपोली शहरात व मावळातील देहूरोड शहरात कोरोना रुग्ण सापडल्याने लोणावळा प्रशासनाने बाजारपेठेतील गर्दी टाळण्याकरता कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामुळे बाजारभागात गर्दी होत असल्याने गर्दी टाळण्याकरिता आठवड्यातील सर्व दिवस सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 या काळात सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांनी आता घाबरून जाण्याचे किंवा बाजारपेठेत वस्तू खरेदी करण्याकरिता गर्दी करण्याचे कारण नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सोयीनुसार जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी, तसेच घरपोच सेवेचे लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.