Lonavla : टाकवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब गरुड


एमपीसी न्यूज – टाकवे खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाळासाहेब मधुकर गरुड यांची शुक्रवारी (दि.29) बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

मनिषा गरूड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यावेळी बाळासाहेब गरुड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणी लोखंडे यांनी गरुड यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे आजी व माजी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.