BNR-HDR-TOP-Mobile

Lonavla : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इनोव्हा कारने एका ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (गुरुवारी) पहाटे सहाच्या सुमारास पिंपळोली गावच्या हद्दीत झाला.

ट्रक चालक राजाभाई गुलाब पठाण (वय 40, रा. बोरगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सिद्दीकी मोहम्मद ताहीर (वय 44, रा. भाईंदर मुंबई) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , राजाभाई व्हीआरएल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एका ट्रकवर (ए पी 29, यू 1104) चालक म्हणून काम करतात. अहमदाबाद येथून माल घेऊन विजयवाडा येथे जात होते. ते मुंबई पुणे द्रुतगरी मार्गावरून जात असताना पिंपळोली गावच्या हद्दीत आल्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास आले असता एका इनोव्हा कारने (एम एच 02 / इ एच 6351) ट्रकला मागून धडक दिली. यात कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.