Lonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या नाणे मावळ अध्यक्षपदी वाकसई गावातील अमोल केदारी यांची निवड करण्यात आली. विधानसभा निवडणुकीपुर्वी केदारी यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मावळ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी त्यांची नियुक्त जाहीर केली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब नेवाळे, प्रशांत ढोरे, मिलिंद बोत्रे, प्रदिप हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप पक्षाची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यत पोहचवत नाणे मावळात भाजपाचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे केदारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.