Lonavla Swimming Pool: शिवबाच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : तुंगार्ली येथील पुष्पा व्हिला या खाजगी बंगल्यातील स्विमिंगपूल मध्ये बुडून दोन वर्षीय शिवबा चा जन्मदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 13 जुलै रोजी घडली होती. (Lonavla Swimming Pool) याप्रकरणी अखेर लोणावळा शहर पोलिसांनी सहा जणांसह लोणावळा नगरपरिषदेवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत भादवी कलम 304 (अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

मयत सायबाचे वडिल अखिलकुमार नारायणराव पवार (वय 47 वर्ष धंदा नोकरी रा. 103 पर्पल ड्रीम सिटी, टाकळी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात डॉ. प्रमोद काशिनाथ बहाळकर  (रा. चेंबुर. पुष्पा बंगल्याचे मालक), नरेशकुमार मुरलीधर भोजवाणी व राजेश निंबाले (दोघेही रा. मंगल विलास ओर्चिड रिसोर्ट मागे, कैवल्यधाम रोड समोर, तुंगार्ली लोणावळा) तसेच घटना घडते वेळी हॉलमध्ये हजर असलेले इतर तीन इसम (नाव पत्ता माहित नाही) व लोणावळा नगर परिषद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dirty Toilets: पं.जवाहरलाल नेहरू मुलांच्या शाळेतील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य, ठेकेदार व प्रशासनावर कारवाईची मागणी

अखिल पवार त्यांच्या दोन मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 13 जुलै रोजी तुंगार्ली येथील पुष्पा व्हिला या बंगल्यात कुटुंबातील सदस्यांसह आले होते. (Lonavla Swimming Pool) यावेळी बंगल्यातील स्विमिंगपूल मध्ये ठेवलेल्या खेळण्यांकडे आकर्षित होऊन दोन वर्षाचा शिवबा पाण्याकडे गेला व स्विमिंगपूल मध्ये पडून त्याचा वाढदिवसाच्या दिवशी दुदैवी मृत्यू झाला होता.

 

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. (Lonavla Swimming Pool) दरम्यान तपास करत असताना निष्पन्न झालेल्या माहितीवरुन वरील सर्वांवर भादंवी कलम 304 (अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.