Lonavla: तिकोणागडाच्या डागडुजीसाठी मावळ्यांनी केली 400 दगडांची वाहतूक

एमपीसी न्यूज – तिकोणागडावरील पडझड झालेल्या वास्तुंची डागडुजी करण्याचे काम वडगांव मावळ येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने होती घेतले आहे. या वास्तुंची दुरूस्ती तसेच शक्य त्या ठिकाणी पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. या कामासाठी गडावर विविध संस्थांच्या मदतीने मानवी साखळी करून 400 दगडांची वाहतूक करण्यात आली.

गडाच्या पडझड झालेल्या वास्तुंच्या डागडुजीकरिता गडावर दगडांची आवश्यकता आहे.  यापूर्वी गडावर रज्जुमार्गाव्दारे एक हजार दगड पोचवले असून गडपायथ्याशी अजून एक हजार दगड उरले आहेत. गडावर पोहच झालेले दगड डागडुजी करावयाच्या ठिकाणी वाहून नेण्याकरिता  श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेसाठी संस्थेच्या पदाधिकारी व गडावर आलेल्या पर्यटकांनी मानवी साखळी तयार करत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत 400 दगडांची वाहतूक केली.

 

गडावरील उरवरीत कामासाठी अजून भरपूर दगडांची गरज भासणार आहे. यासाठी येत्या रविवारी (दि.22) श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रमदान मोहिमेत शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन नितीन चव्हाण यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.