Lonavla : भाजी खरेदीसाठी गर्दी न करण्याचे लोणावळा पोलिसांचे आवाहन

0

एमपीसी न्यूज- लाॅकडाऊन’मुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक भाजी मंडई आणि किराणा दुकानात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

लोणावळा शहरांमध्ये आज (बुधवारी) पीए सिस्टीमचा वापर करून भांगरवाडी परिसरातील हनुमान टेकडी ,भांगरवाडी चौक, सोसायट्यांमध्ये माइकद्वारे घोषणाकरून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधे खरेदीसाठी गर्दी न करण्याचे व घरातच राहून स्वत:ची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like