Lonavla News: बालकाच्या मृत्यु नंतर प्रशासनाला आली जाग

लोणावळ्यात स्विमिंगपूलांचा होणार सर्व्हे

एमपीसी न्यूज: लोणावळा शहरातील एका खाजगी भाड्याने दिल्या जाणारया बंगल्यातील स्विमिंग पूल मध्ये एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्यानंतर शहरातील (Lonavla News) असे खाजगी स्विमिंगपूल आणि त्यांच्या सुरक्षा नियमांच्या बाबत प्रसिध्दी माध्यमातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.

 

या घटनेनंतर लोणावळा नगरपरिषद आता ऍक्शन मोड मध्ये आली आहे. (Lonavla News) बुधवारी नगरपरिषद अधिकार्यांची बैठक घेत नगरपरिषद अधिकारी यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून पुढील दोन दिवसात शहरातील हर एक भागात असलेल्या बंगल्यात तसेच रो हाऊस मध्ये बांधण्यात आलेल्या स्विमिंगपुलचा सर्व्हे करून ते अधिकृत आहे की अनाधिकृत आहे याचा अहवाल सादर करण्याबाबतचा आदेश लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिला आहे.

 

PCMC News: महापालिका मेडिकल कॉलेज सुरू करणार

 

 

पर्यटन स्थळ तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वदूर प्रसिध्द असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांना खाजगी बंगल्यांना जास्त पसंती देतात. मात्र त्यातही ज्या बंगल्यात जलतरण तलाव आहे असे बंगले प्राधान्यक्रमाने आणि जास्त पैसे देऊन बुक केले जातात. त्यामुळे बंगले भाड्याने देणारया बंगले धारकांकडून आपल्या बंगल्याच्या किंवा रो हाऊसच्या आवारात ज्या ठीकाणी मोकळी जागा मिळेल तेथे अक्षरक्ष: हवा तसा खड्डा खणून जलतरण तलाव तयार केला जातो आहे. आणि हे तयार करीत असताना कोणत्याही सुरक्षा मानकांचे पालन केले जात नाही.

 

 

 

असे बेकायदेशीर जलतरण तलाव असलेले शेकडो, हजारो बंगले, रो हाऊस लोणावला शहर आणि आजुबाजूच्या परिसरात आहे. (Lonavla News) पण विशेष म्हणजे याबाबतची कोणतीही आकडेवारी संबधित प्रशासनाकडे उपल्बध नाही. एकट्या लोणावला नगरपरिषद हद्दीमध्ये असे बेकायदा स्विमिंग पूल असलेले असंख्य बंगले धारकांकडून बांधण्यात येत असलेल्या या स्विमिंग पुलबाबत कोणत्याही स्वरूपाचा डाटा नगरपरिषदेकडे आजमितीला उपलब्ध नाही.

 

तसेच स्विमिंग पूल बांधकाम नियमांमध्ये स्पष्टता आण्ण्याचा निर्णय मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी घेतला आहे. वास्तविक बाधकाम पुर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर झालेले बांधकाम हे बेकायदेशीर समजले जाते. याचा तत्वावर शहरातील बांधकामाचा सर्व्हे करत डाटा गोळा केल्यास स्विमिंगपूल सोबत कीती बांधकामे अनाधिकृत आहेत याची देखील माहिती येण्यास मदत होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.