लोणावळा : हनी श्वान बेपत्ता झाल्याची लोणावळ्यात तक्रार दाखल

एमपीसी न्यूज – हा जर्मन शेफर्ड जातीचा पाळीव मादी कुत्रा मागील आठवड्यात हारविल्याची तक्रार नुकतीच लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सखाराम तुकाराम पाटील (रा. खत्री पार्क, वलवण लोणावळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

18 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हनी बेपत्ता झाली. पाटील यांच्या पत्नीचे हनीवर खूप प्रेम असल्याने त्यांनी जेवणखाण सोडून हनीचा परिसरामध्ये खूप शोध घेतला पण हनी कोठेच सापडला नाही, त्यामुळे आशेचे सर्व दरवाजे बंद झाल्याने निराश होऊन त्यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर पोलीस निरीक्षक  बी.आर पाटील यांनी मिसिंग तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले व ठाणे अंमलदार अमोल कसबेकर यांनी जनावर मिसिंग या सदराखाली त्यांची तक्रार नोंदवून घेतली.

अशा प्रकारे प्राणी हरविल्याची ही पहिलीच तक्रार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली, या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक विजय मुंढे हे करत आहेत. मालकाशी इमान राखणारा व कधीही विश्वासघात न करणारा अशी ओळख असणाऱ्या श्वानाची सुद्धा शोध मोहीम चालू करण्यात आलेली आहे, पोलिसांनी माणसासारखेच बेपत्ता झालेल्या कुत्र्याच्या प्रकरणी सुद्धा गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल सखाराम पाटील यांनी पोलिसांचे आभार मानले. त्यांनी कोणाला त्यांचा पाळीव कुत्रा हनी आढळून आल्यास लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 02114 – 273033 व 7066962325  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.