Lonavla : पवना धरणात दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – पवन मावळातील पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमेय दिलीप राहते ( वय २५) व तेजस रवि पांगर ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी (दि.१५) पवना धरण परिसरात अमेय व तेजस हे अन्य दोन मित्रांच्या सोबत फिरायला आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण पाण्यात पोहण्याकरिता उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन दोघांचा मृत्यू झाला.

घटनास्थळाकडे आलेल्या इतर पर्यटकांनी अमेय व तेजस यांना पाण्यातून बाहेर काढले मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे सहायक फौजदार सुनील बाबर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.