Lonavla : कार्ला गावातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा युवा सेनेकडून गौरव

Yuva Sena honors 12th pass students in Karla village

एमपीसी न्यूज – इयत्ता बारावीच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या कार्ला गावातील विद्यार्थ्यांचे युवा सेनेकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रथम क्रमांक साक्षी बाबुराव नरवाडे 73.84%, द्वितीय क्रमांक अभय सुभाष चव्हाण 73.07% व तृतीय क्रमांक प्रतिमा सुभाष कुंभार 70% यांचे अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, युवा सेना शाखा अधिकारी आदित्य हुलावळे, उपशाखा अधिकारी दिनेश हुलावळे, भाविसे शाखा संघटक आदेश हुलावळे,उपशाखा संघटक अमोल इंगवले, उपशाखा संगटक अक्षय केदारी, उपशाखा संघटक आशिष हुलावळे, आकाश केदारी उपस्थित होते.

दरम्यान, कार्ला येथील एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता महाविद्यालयाच्या कॅामर्स शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.