London : “डकवर्थ लुइस” प्रणालीचे जनक टोनी लुइस यांचे निधन

एमपीसी न्यूज – क्रिकेटमधील डकवर्थ लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस (78) यांचे बुधवारी लंडन येथे निधन झाले. टोनी यांनी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ लुइस पद्धत 1997 मध्ये अमलात आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 1999 मध्ये तिचा स्वीकार केला.

डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास गणिताची आकडेमोड करत षटके कमी करण्यात येतात. लुइस यांची ही प्रणाली क्रिकेटमध्ये चांगलीच गाजली. अजूनही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुइस प्रणालीचा आधार घेतला जातो. लुइस यांना क्रिकेट आणि गणितातील या संशोधनाबद्दल ‘एमबीई’ या ब्रिटनमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.

आयसीसी कडून लुइस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लुइस यांचे योगदान सदैव स्मरणात राहील असे आयसीसीने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.