London : कोरोना महामारीच्या थैमानामुळे यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द

एमपीसी न्यूज – कोरोना या जागतिक महामारीने जगभर थैमान घातले असल्यामुळे २८ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणारी विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे.

करोनामुळे ब्रिटनमधील परिस्थिती गंभीर बनली असून प्रिन्स चार्ल्स तसेच पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 474 पर्यंत वाढली असून आतापर्यंत 2,352 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी प्रथमच विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तसेच सात जूनपर्यंत सर्व स्पर्धा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. आता ऑल इंग्लंड क्लबकडे नैसर्गिक हिरवळीवर होणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्याचा अपेक्षित निर्णय जाहीर केला.

ब्रिटनमधील जनता, परदेशातून येणारे चाहते तसेच खेळाडू, पाहुणे, सदस्य, कर्मचारी, स्वयंसेवक, कंत्राटदार यांच्या आयुष्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर समाजाचे हित जपण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही स्पर्धा रद्द करत आहोत. तिकीट विकत घेतलेल्यांचे सर्व पैसे परत केले जातील अथवा पुढील वर्षी त्याच दिवशीचे तिकीट त्यांना दिले जाईल, असे ऑल इंग्लंड क्लबच्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.