Chinchwad News : लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा द्यावा – रेल्वे प्रवासी संघ

एमपीसी न्यूज – येत्या काही दिवसात पुणे यार्डचे रिमोल्डींग चे काम चालु होणार असून, यार्ड रिमोल्डींगचे काम पुर्ण होण्याकरिता सुमारे एक वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणुन रेल्वे प्रवासी संघ (Chinchwad News) पिंपरी-चिंचवड चे अध्यक्ष ईक्बाल मुलानी यांच्या वतीने व डी. आर. यू. सी. सी. सदस्य बशीर सुतार यांनी रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
या कालावधीमध्ये पुणे स्थानकावरील प्रवांशाचा भार कमी करण्यासाठी मुंबई वरून येणा-या व मुंबई कडे जाणा-या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांना. पुणे यार्डचे रिमोल्डींगचे काम पूर्ण होत पर्यंत चिंचवड या मध्यवर्ती स्थानकात थांबा देण्याची विनंती केली आहे. एप्रिल महिन्यापासुन सुट्टीचा कालावधी सुरू होत असून तो साधारणपणे जुलै महिन्या पर्यत मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात. याचा मोठ्या प्रमाणावर भार पुणे स्टेशन वर पडत असून , हा भार कमी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुणे-लोणावळा दरम्यानच्या चिंचवड या मध्यवर्ती स्थानक थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आणि देहूरोड, तळेगाव येथील सुमारे 40 लाख नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊन प्रवाशांच्या वेळेची तसेच आर्थिक (Chinchwad News) बचत मोठ्या प्रमाणावर होऊन त्यांना रेल्वे चा सुखकर प्रवास होईल. याकरिता रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड पुणे च्या वतीने पुणे विभाग, मध्य रेल्वे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
Chakan Crime : चाकण येथे दुकानातून दागिने चोरून नेणाऱ्या चोराला अटक
तसेच आज पुणे मंडल रेल प्रबंधक यांच्या कडे झालेल्या डी.आर.यु.सी.सी. मेंबर च्या बैठकीत बशीर सुतार यांच्या वतीने रेल्वे प्रशासनास सुध्दा पत्र देऊन चिंचवड स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे स्टेशन वरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी, व यार्ड रिमोल्डींग च्या कामामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी चिंचवड या मध्यवर्ती स्टेशनात सर्व लांब (Chinchwad News) पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देणे गरजेचे आहे असे मत रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड पुणे चे अध्यक्ष इक्बाल भाईजान मुलाणी यांच्या वतीने मांडण्यात आले आहे.