Loni Kalbhor Crime News : शेजाऱ्याच्या नातेवाईकाने बलात्कार केला, अल्पवयीन तरुणी प्रेग्नंट राहिल्याने बिंग फुटले

एमपीसीन्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. 15 वर्षीय मुलगी प्रेग्नेंट राहिल्याने या प्रकाराला वाचा फुटली. घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले.  

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चेतन कोटमळे (वय 27) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी याचे नातेवाईक शेजारी राहतात. दरम्यान आरोपी चेतन याने फिर्यादी यांच्या मुलीला टेरेसवर नेहून तिची छेड काढत तिच्यासोबत बळजबरीने बलात्कार केला. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.