Loni Kalbhor Crime News : मद्यपी मुलाने आजारी वडिलांचा खून करून मृतदेह घरातच लपवला

0

एमपीसीन्यूज : लोणीकाळभोर परिसरात एका मद्यपी मुलाने आजारी असणाऱ्या वडिलांचा खून करून मृतदेह दोन दिवस घरातच लपवून ठेवला होता. त्यानंतर दोन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या मद्यपी मुलाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रहीम गुलाब शेख (वय 68) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर नईम रहीम शेख (वय 35) याला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरुळी कांचन परिसरात नईम शेख हा वडील, बहीण आणि भाच्यासह राहतो. तो मोटर सायकल दुरुस्तीचे काम करतो.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान नईमचे वडील रहीम शेख हे मागील एक महिन्यांपासून आजारी होते. सोमवारी त्याने वडिलांची कोरोना चाचणी देखील केली होती. ही चाचणी निगेटिव आली होती. परंतु मंगळवारी नईमच्या अंगात राक्षस संचारला आणि त्याने वडिलांच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्यांचा निर्घुण खून केला.

खून केल्यानंतर त्याने दोन दिवस वडिलांचा मृतदेह घरातच ठेवला होता. तसेच घरात असणाऱ्या बहीण आणि भाच्याला याविषयी कुठेही सांगू नका असे सांगत दम दिला होता. परंतु आज दुपारी त्याची विभक्त राहत असलेली पत्नी घरी आली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला ताब्यात घेतले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment