Loni Kalbhor Crime News : ‘स्कॉर्पिओ’तून सुरू होती गावठी दारूची वाहतूक, अखेर पोलिसांनी…

एमपीसीन्यूज : लोणी काळभोर पोलिसांनी गावठी दारूची वाहतूक करणारी एक स्कार्पिओ गाडी जप्त केली असून चालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी अकराशे लिटर गावठी दारू जप्त केली. पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी आणि दारू असा चार लाख 59 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी गोविंद सखाराम गायकवाड (वय 34) याला अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, सोमवारी सकाळी शिंदवणे गावातून पिंपरी-चिंचवडला स्कॉर्पिओ गाडीतून गावठी दारू नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी आज सकाळी थेऊर फाटा या ठिकाणी सापळा रचला होता. सकाळच्या सुमारास या ठिकाणी आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली असता त्यांना आतमध्ये गावठी दारूचे कॅन आढळले.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी 59 हजार पाचशे रुपयाची गावठी दारू तर चार लाख रुपये किंमतीची स्कार्पिओ गाडी जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.