Loni Kalbhor Crime News : ट्रक चुकविण्याच्या नादात दुचाकी लोखंडी खांबावर आदळली, दोन तरुण जागीच ठार

एमपीसीन्यूज : पनवेलच्या दिशेने निघालेली एक दुचाकी रस्त्यावर उभा असणाऱ्या ट्रकला चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी खांबाला धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

विनायक अंबऋषी मोरे (वय 37) आणि ईश्वर व्यंकटराव मुंगळे (वय 25) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही टेक्निशियन म्हणून काम करतात.

रविवारी रात्री दोघेही दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जात होते. यावेळी विनायक मोरे हे दुचाकी चालवत होते. लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माळीमळा या ठिकाणी ते आले असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक ट्रक उभा असलेला त्यांना दिसला.

या ट्रकला आपली दुचाकी अडकू नये म्हणून मोरे यांनी दुचाकी रस्त्याच्या खाली घेतली. याचवेळी मोरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. आणि त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या एका गॅरेजच्या लोखंडी खांबाला जाऊन धडकली.

दुचाकी भरधाव वेगात असल्यामुळे लोखंडी खांब वाकला, तर दुचाकीवरील दोघेही दूरवर जाऊन पडले. यामध्ये त्यांच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.