गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Loni Kalbhor : कुत्र्याने कोंबडी पळवल्याचा जाब विचारल्याने शेजाऱ्यावर प्राणघात हल्ला, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : शेजारी राहणाऱ्या (Loni Kalbhor) व्यक्तीच्या पाळीव कुत्र्याने कोंबडी पळून नेल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यावर एका व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रुपनर वस्ती या ठिकाणी 22 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

अनिकेत रवींद्र काळभोर, रवींद्र काळभोर, मंगेश काळभोर आणि त्याच्या चार ते पाच साथीदार विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अनिकेत काळभोर आणि रवींद्र काळभोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. धनंजय बाळासाहेब वीरकर (वय 31) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune Accident : वाजपेयी पुलावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे

याप्रकरणी अधिक माहिती, फिर्यादी आणि आरोपी अनिकेत काळभोर हे शेजारी शेजारी राहतात. फिर्यादी यांची कोंबडी आरोपीच्या कुत्र्याने पळून नेली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून प्राणघातक हत्यारे (Loni Kalbhor) घेऊन येत फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीची पत्नी आणि वहिनी या भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

spot_img
Latest news
Related news