Loni Kalbhor News: एमआयटी महाविद्यालयाच्या घुमटावरून खाली पडल्याने 22 वर्षीय कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज: लोणी काळभोर परिसरातील एमआयटी महाविद्यालयाच्या घुमटावर काम करत असताना 60 ते 70 फूट उंचीवरून खाली पडल्याने एका 22 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी ठेकेदारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिवाराम मोहनलाल (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर ठेकेदार देवाराम नवाजी परमार त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जीवाराम हा लोणी काळभोर परिसरातील एमआयटी कॅम्पसमध्ये काम करत होता. काम करत असताना 60 ते 70 फुट उंचीवरून तो खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान ठेकेदार देवाराम परमार याने कामगारांचा वृक्ष बाबत योग्य ती साधने न पुरवल्याने व कामाच्या ठिकाणी सुरक्षा जाळी न लावल्याने जीवाराम हा खाली पडून मृत्युमुखी पडला. म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.