Loni Kalbhor News: आठ गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड पिस्तूल आणि काडतुसासह जेरबंद

एमपीसी न्यूज – दरोड्याची तयारी, घरफोडी, विनयभंग यासह तब्बल आठ गुन्ह्याची नोंद करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसासह जेरबंद केले.

प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे (वय 21 रा.शांतीसागर वसाहत, हडपसर) असे या सराईत गुंडाचे नाव आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एलसीबीचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना वरील आरोपी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहर क्लाथ सेंटर समोर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी शाखेने सापळा रचून अटक केली.

यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यानेे बेकायदेशीरित्या बाळगलेली एक जिवंत काडतूस आणि गावठी बनावटीची पिस्टल सापडली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक केली.

आरोपी हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याची तयारी, घरफोडी, विनयभंग यासह आठ गुन्हे दाखल आहेत.

पुढील तपासासाठी त्याला लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III