Loni Kalbhor News : प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज-एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध असताना महिलेच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने राहत्या घरी (Loni Kalbhor News)आत्महत्या केली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंतरवाडी येथे 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश सुरेश जाधव (वय 31) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील सुरेश मारुती जाधव (वय 53) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत मंगेश याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती विवाहित महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने मंगेश जाधव याला फोन करून ठार मारण्याची धमकी दिली होती. या दोघा पती-पत्नी मंगेश याला वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.