_MPC_DIR_MPU_III

Loni kalbhor : पुण्यात कुत्र्याने अंगणात घाण केल्यामुळे  शेजारणीमध्ये जुंपली

The two neighbors got into a heated argument over why the dog had littered the yard पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार गुरुवारी घडला.

एमपीसी न्यूज – कुत्र्याने अंगणात घाण केल्याच्या कारणावरून दोघी शेजारणीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या झटापटी नंतर एकीने दुसरीच्या डोक्यात स्टीलचा हंडा मारून तिला जखमी केले. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार गुरुवारी घडला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी इंदिरावती रामप्रकाश यादव (वय 46) या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर सुमीला लालूप्रसाद राजघर या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील होळकरवाडी या गावात फिर्यादी आणि आरोपी महिलेची शेजारी शेजारी घरी आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सुमीला राजघर यांच्या कुत्र्याने फिर्यादी यांच्या अंगणात घाण केली. यावेळी फिर्यादी या सुमिला यांना ‘तुमचा कुत्रा रोज रोज आमच्या अंगणात घाण करतो, तुम्ही त्याला दुसरीकडे घेऊन जात जा’ असे सांगितले. असे सांगितल्याचा राग आल्याने सुमीला राजघर यांनी फिर्यादीना शिवीगाळ केली आणि जवळ असलेला स्टीलचा हंडा तिचा डोक्यात मारला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बंडगर करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.