Loni Kalbhor News : आमदार अशोक पवार यांच्याहस्ते लोणी काळभोर कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

एमपीसीन्यूज : लोणी काळभोर ( ता. हवेली) येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार आणि हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या हस्ते आज शनिवारी करण्यात आले.

यावेळी तहसिलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खरात, डॉ. माधव जाधव इ. उपस्थित होते. या कोविड केअर सेंटरमध्ये 200 खाटांची क्षमता आहे. या केंद्रातील आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सुविधांची आमदार पवार यांनी पाहणी केली.

_MPC_DIR_MPU_II

यासंदर्भात काही बाबींवर उपविभागीय अधिकारी बारवकर आणि वैद्यकीय अधिकारी व तहसिलदार यांच्यासोबत चर्चा केली. यात रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या, रक्त चाचण्या, आहार, महिला रुग्णांची स्वतंत्र निवास व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येथे कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा व कोविड केअर सेंटर बाबत आमदार पवार यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी यांचा दौरा वैद्यकीय चमूचे मनोबल वाढवणारा ठरणार असल्याची भावना उपस्थित कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.