Lonikand : गर्भवती महिलेला मारहाण; पोटावर दगड लागल्याने विवाहितेचा गर्भपात

एमपीसी न्यूज : काही कारण नसताना वाद उकरून (Lonikand) काढत मायलेकींना मारहाण करण्यात आली. यामध्ये गर्भवती महिलेच्या पोटावर दगड लागल्याने रक्तस्त्राव होऊन त्या महिलेचा गर्भपात झाला. वाघोलीतील विटकर चाळ परिसरात 26 मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल मुकेश पवार (वय 21) आणि करण मुकेश पवार (वय 25) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. एका 22 वर्षीय महिलेने या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

MPC News Special : उमलत्या वयात खुडल्या जाताहेत कळ्या

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. 26 मे च्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या आईसोबत सार्वजनिक शौचालयात निघाल्या होत्या. त्याचवेळी आरोपी राहुल पवार यांनी काही कारण नसताना फिर्यादी आणि त्यांच्या आईला स्वीकार केली. माझे वाटोळे करून तुझी पोरगी कशी सुखी संसार करते ते बघून घेतो अशी धमकी दिली. आणि त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांना दगड फेकून मारले.

फिर्यादी यांच्या पोटात दगड लागल्याने रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्यांना (Lonikand) ससून रुग्णालयात ऍडमिट केले असता उपचारादरम्यान त्यांचा गर्भपात झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.