Lonikand crime News : सोन्याचा मुलामा देऊन चांदीची अंगठी विकणाऱ्या भामट्यावर गुन्हा

ही घटना हवेली तालुक्यातील पेरणे गावात घडली.

एमपीसी न्यूज – सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची अंगठी विकून 27 हजार रुपयांची फसवणूक करणा-या चिंचवडमधील एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील पेरणे गावात घडली.

पंकज अशोक टाक (वय 37, रा. प्रेस्टीज कॉलनी, टेल्को रोड, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण दत्तात्रय गायकवाड (वय 39, रा. आंबेगाव बु. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणे गावात आरोपी पंकज याने फिर्यादी प्रवीण यांना सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची अंगठी सोन्याची असल्याचे भासवून 27 हजार रुपयांना विकली.

कालांतराने अंगठीवरील मुलामा गळून पडू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण यांनी याबबत पंकज याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.