Lonvala : शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिपाईचा मशाल मार्च

Lonvala : शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिपाईचा मशाल मार्च

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीर पुलवामा जिल्हायात भारतीय सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याकरिता दीक्षा भूमी ते सुभाष चंद्रभोस चौक दरम्यान रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया लोणावळा शहर‍ाच्या वतीने मशाल मार्च काढण्यात आला होता.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नवनिर्वाचित लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती मावळ तालुकाध्यक्ष नारायण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थिती हा मार्च पार पडला. मोठ्या संख्येने नागरिक हातात कँडल घेऊन या मार्च मध्ये सहभागी झाले होते.

  • यावेळी लोणावळा शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के, युवकाध्यक्ष राजू देसाई, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, उपाध्यक्ष संजय अडसुळे, धमारक्षित जाधव, महिला आघाडीच्ता जिल्हाध्यक्ष यमुना साळवे, मालन बनसोडे, अशोक सरवते, उषा जाधव, रवींद्र गायकवाड, वसंत देसाई, चंद्रकांत गायकवाड, विजय देसाई, सुभाष भालेराव, अशोक साळवे, जयराम कदम, महेंद्र देसाई, चंद्रकांत कांबळे, मधुकर मिसाळ, केतन गायकवाड, कुशल वाघमारे, सागर चव्हाण, रमेश भालेराव, शाम भालेराव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलमशिल म्हस्के व राजु देसाई यांनी या मार्चचे आयोजन केले होते.

लोणावळा बाजारपेठ दुपारपर्यत बंद
शहिद जवनांना श्रद्धांजली वाहण्याकरिता लोणावळा व्यापारी असोसिएशनच्या वतीने दुपारपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहरातील सर्व लहान मोठे व्यावसायीक यांनी शिवाजी चौकात एकत्र येत जम्मू काश्मिर येथिल दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला. शहिदांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या. मोठ्या संख्येने राजकिय पक्षांचे पदाधिकारी व व्यापारी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.