Pune News : शाहरुखच्या मुलाला पकडणाऱ्या किरण गोसावी विरोधात लूक आऊट नोटिस जारी

पुणे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी किरण गोसावी विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर क्रूझवर झालेल्या कारवाईत किरण गोसावीचा सहभाग होता. त्याच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. 

गोसावी याने फेसबुकद्वारे एका तरुणाला मलेशियात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 3 लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यानुसार 29 मे 2018 रोजी त्याच्यावर हा गुन्हा दाखल आहे. मात्र त्यानंतर तो फरार झाला होता. तो सापडत नसल्याने त्याला फरार म्हंटले होते.

काही दिवसांपूर्वी क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने कारवाई केली होती. त्यात आर्यन खान याला पकडण्यात आले होते. त्यादरम्यान हा किरण गोसावी त्याच्यासोबत दिसून आला होता. त्याने आर्यन खानसोबत एक सेल्फी देखील काढला होता.

एनसीबीने किरण गोसावी याला पंच म्हणून नेल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळपासून किरण गोसावी चर्चेत आला होता. दरम्यान पुणे पोलिसांनी आता त्याच्यावर मोठी कारवाई करत त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढली आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता गृहीत धरली असून, त्याने कोठेही जाऊ नये, यासाठी ही नोटीस काढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.