Chakan News : कुरूळी येथे दरोडा टाकून 38 हजारांचा ऐवज लंपास 

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कुरुळी येथे एचपी पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या गेस्टहाऊस जवळ पाच अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामध्ये एका तरुणाला मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून 38 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 30) मध्यरात्री घडली.

प्रमोद बाबुराव कांबळे (वय 23, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच अनोळखी इसमांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद कांबळे बुधवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास कुरूळी येथील एचपी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या गेस्ट हाउस जवळून पायी चालत जात होते. त्यावेळी डोंगर भागातून पाच अज्ञात दरोडेखोर फिर्यादी यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादीचे गचांडी पकडून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पाण्याने भरलेली एक लिटर प्लास्टिकची बाटली फिर्यादी यांच्या कानावर मारून त्यांना दुखापत केली. लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील 38 हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने काढून आरोपींनी चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.